गहू

गहू

Category

धान्य पिके

गहू

गहू पिकाचे नियोजन

गहू पिकास जितकी जास्त थंडी मिळते तितके पिक वाढीस पोषक वातावरण व उत्पादनात वाढ होते. गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात आणि फार झाले तर 15 डिसेंबर पर्यंत करावी या वर्षी बऱ्याच शेतकर्‍यांनी जानेवारी महिन्यात पेरणी करून माझ्या तंत्राचा वापर केला व बऱ्या पैकी उत्पादन घेतले परंतू नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेले गव्हाचे उत्पादन भरघोस असते हे लक्षात घ्यावे. प्रति एकरी 20 क्विंटल पासून तर 30 क्विंटल पर्यंत वेगवेगळ्या जमिनीच्या पोत प्रमाणे उत्पादन काढता येते.

♦️ वाणाची निवड :बाजारात गव्हाच्या भरपुर संशोधित जाती आहे. यापैकी आपल्या आवडी नुसार वाण निवडावे. अजित 108, 102, शरबती, नर्मदा या वाणांनी या वर्षी बऱ्यापैकी उतारा दिला आहे व खाण्यासाठी रुचकर आहे.

♦️ बिज प्रक्रिया :जमिनीच्या पोत प्रमाणे एकरी 20 ते 30 किलो बियाणे घेणे :

स्कायगोल्ड जेल - 100 ग्राम + बावीस्टीन 100 ग्राम

यांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळू देणे.

♦️ जमिनीची मशागत :पन्जी करून व रोटर करून पाळी करून घेणे.

♦️ पेरणी :गव्हाची पेरणी करताना दोन ओळी मधील अंतर 10 ते 12 इंचा पर्यंत ठेवावे. तरच फुटवे भरपूर फुटतील दाणा 2 ते 3 इंचा पेक्षा खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणी सोबतच खत द्यावे/शिंपले तरी चालेल.

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो


♦️तणनाशक पेरणीनंतर 21 ते 25 दिवसात अलग्रीप या तणनाशकाची फवारणी करून रुंद पानांच्या तणाचे नियंत्रण करावे. ( प्रत्येक पंपात कॅप्टन 30 मीली टाकावे ) - वरील फवारणी नंतर 7 च्या दिवशी लगेच फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5.मि.ली

रोको

20 ग्राम

♦️या फवारणीमुळे पांढऱ्या मुळ्या सुधृढ होण्यास व भरपुर फुटवे फुटण्यास मदत होते. पोंगा पिवळा पडुन सुकत असल्यास पोंगा उपसुन पहावा त्यात बारीक पांढऱ्या अळ्या दिसतात. असे असल्यास वरील फवारणी मध्ये फायर 101 - 25 मि.ली प्रति पंप घ्यावे. या नंतर पेरणी पासुन 40 ते 42 दिवसात युरिया 30 किलो प्रति एकरी शिपांवा व पाणी द्यावे.

♦️पिकावर 2 ते 4 ओंबी दिसल्यास लगेच पुढील फवारणी घ्यावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

अविष्कार

5.मि.ली

जीब्रॅक्स

25 मी.ली


♦️पिकावर तांबेरा दिसत असल्यासबलवान 25 मि.लीमहा झिंक - 25 ग्रामही फवारणी घ्यावी. गहू पिकाला किमान 5 ते 6 पाणी आवश्यक आहे यांची नोंद घ्यावी.