टरबूज, खरबूज
Category
फळबाग
टरबूज आणी खरबूज व्यवस्थापन
♦️टरबूज म्हणजेच कलिंगड, महाराष्ट्रभर आवडीने खाल्ल्या जाणारे पाणीदार फळ. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कलिंगड लोकप्रिय आहे. दरसाल याची मागणी वाढतच आहे. उन्हाळ्यात तापमानामुळे होणारी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी व थंडावा निर्माण करण्यासाठी हे फळ खुपच उपयुक्त आहे. यांचा गर हा स्वादिष्ट व रुचकर असतो. याचे लागवड तंत्र अगदी सोपे आहे. कमी कालावधीत व कमी खर्चात येणारे हे पीक भरपुर उत्पन्न देऊ शकते, पूर्वी फक्त नदीच्या पात्रातच घेण्यात येणारे हे पीक आता सर्रास शेतामध्ये घेतल्या जात आहे. कलिंगड़ बलवर्धक असून शीतकारक, पौष्टीक के पित्तहारक आहे. याच्या सेवनाने मनावरिल तनाव कमी होतो.
कलिंगड या फळामधून फॉस्फरस लोह बी व ई जीवनसत्व मिळत असल्यास रक्तवाढ होण्यास व रक्त शुद्धिकरण होण्यास मदत मिळते. अलिकडच्या काळात कलिंगड व खरबुजचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले आहेत. पॉलीहाऊस व शेडनेटमध्ये सुध्दा शेतकरी आता हे पिक घेत आहे.
♦️ जमिनीची मशागत :कलिंगड या पिकासाठी उत्तम निचरा होणारी मध्यम जमीन सर्वोत्तम ठरते. भारी काळ्या जमिनीत वेली लांब होतात. सेंद्रिय खते वापरल्यास हे पिक अति उत्तम येते. जमिनीची मशागत करतांना खोल नांगरट करून प्रति एकरी सुपर फॉस्फेट 1 बॅग व जय संजीवनी 5 किलो शिंपावे. प्रक्रिया केलेले शेणखत असल्यास प्रति एकरी 7 ते 8 गाड्या मिसळावे व कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमिन भुसभूशीत करावी.
♦️माळाची बरडी जमिन किंवा चिवड जमीनीत हे पीक घेऊ नये. कलिंगड व खरबुज हे पीक घ्यावयाचे असल्यास 4-5 गाड्या तळ्यातला गाळ आपल्या शेतामध्ये मिसळल्यास अति उत्तम ठरते. यामुळे वेल लांबणे फळांचे वजन वाढणे हे घडून येते. पिकाची उत्तम उगवन होण्यासाठी 15 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत योग्य वातावरण असते. 29 ने 30 डिग्री सेल्सियस तापमान याला पोषक असते. तसेच जुन-जुलै व सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये या पिकाची लागवड होते. मात्र मे व नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही. परिस्थितीत लागवड करू नये.
♦️ बियाणे निवड :मॅक्स, शुगर क्वीन, सागर किंग, मेलोडी, ऑगस्टा, पारानग्रा, किंवा बाजारात उपलब्ध असलेले उच्च प्रतीचे बीयाणे घ्यावे.
♦️ खरबूज :मधुमिता, केशर, पताशा, मधु, रूबी, निर्मल 65, 24 आणि कुंदन.
♦️ प्रती एकरी बियाणे :टरबूज - 400 ग्राम, खरबुज - 250 ग्राम
♦️ लागवड अंतर :8 x 1.25 हे अंतर सर्वात योग्य आहे, हे शेतकर्याच्या अनुभवातून सिध्द झाले आहे. मल्चींग असल्यास बेडवर भेसळ डोस मल्चींग करण्या अगोदर करावे आणि बेडवर व्यवस्थितपणे टाकावे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
डि.ए.पी | 2 बॅग |
लिंबोळी पेंड | 2 बॅग |
ब्लॅक डायमंड | 20 किलो |
सुफर्ट | 20 किलो |
कार्बोफ्युरॉन | 3 किलो |
♦️ बीजप्रक्रिया :प्रती एकरी 400 ग्राम टरबूज किंवा 250 ग्राम खरबुन बियाणे घेऊन:स्कायगोल्ड जेल - 30 ग्राम + बावीस्टिन - 30 ग्रामकालवून बीजप्रक्रिया करावी.
♦️ लागवड पद्धत :8 x 1.25 एक बी टोबुन लागवड करावी.
♦️ पहिली ड्रिंचिग (आळवणी) :उगवणी नंतर दहा ते बारा दिवसात पहिली ड्रिंचीग करावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1.5 किलो |
ब्लू कॉपर | 500 ग्राम |
19:19:19 | 3 किलो |
मॅग्नेशियम | 5 किलो |
♦️ पहिली फवारणी :(पहिली) उगवणी नंतर 15 ते 18 दिवसात पहिली फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 30 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
फायर-101 | 20 मि.ली |
वीगो | 25 ग्राम |
वरिल फवारणी केल्यानंतर पांढ-या मुळ्यांची वाढ, फळ फांद्याची वाढ, नाग अळी, थ्रीप्स, करपा व डावणी यांचे नियंत्रण करता येते.
♦️ दूसरी आळवणी :यानंतर दुसरी आळवणी 22 व्या दिवशी करावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
मिरॅकल | 1 लिटर |
सुप्रीमो | 2 लिटर |
♦️ उगवणीनंतर दुसरी फवारणी :लागवडी दुसऱ्या आळवणी नंतर 7 ते 8 दिवसाला दुसरी फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मिली |
शक्तिमान गोल्ड | 25 मि.ली |
माइट शूट | 25 मि.ली |
यु.पी.एल चे साफ | 25 ग्राम |
वरिल फवारणीमुळे वेलींची योग्य वाढ व फुलधारणा व्यवस्थित होते.
♦️ या नंतर :
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
12:61:00 | 5 किलो |
बोरॉन | 5 किलो |
25 ते 30 दिवसाला ठिबक दवारे सोडावे. 35 व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो व बोरॉन 1 किलो सोडावे व लगेच पुढील फवारणी करावी.
♦️ तिसरी फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
सोनाटा 70 | 25 मि.ली |
बॉल बोरॉन | 25 मि.ली |
♦️ आळवणी :लागवडी पासून 45 व्या दिवशी.
स्काय गोल्ड जेल | 1 किलो |
ब्लु कॉपर | 500 ग्राम |
0:52:34 | 5 किलो |
ठिबक द्वारे सोडावे व लगेच 46 व्या दिवशी फवारणी करावी.
बलवान | 25 मिली |
करझेट | 30 ग्राम |
♦️51 ते 54 दिवसाच्या दरम्यान 00:00:50 प्रती एकरी 6 किलो सोडावे, व लगेच फवारणी करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
सुपर प्लस | 40 मिली |
संपदा | 25 ग्राम |
कॅल्शियम नाइट्रेट | 25 ग्राम |
जिब्रॅक्स | 40 ग्राम |
यांची फवारणी करावी म्हणजे वेल क्रॅकिंग व फळ तडकणे होणार नाही.
♦️ टीप :फुल दिसताच फळ माशीचे ट्रॅप 10 ते 12 प्रती एकरी या प्रमाणे लावावे. त्यामधील गोळ्या 20 दिवसांनी बदलाव्या. स्टिकींग सापळे (पिवळे नीळे) लागवड झाल्यापासुन 10 दिवसात एकरी 7 ते 10 प्रमाणात लावावे.