स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी

Category

फळबाग

स्ट्रॉबेरी

सिताफळ उत्पादन तंत्रज्ञान

सिताफळ हे भारतातील मधुर, थंड, पौष्टिक व पित्तशामक फळ समजले जाते. रामफळ हनुमान फळ, जायफळ, सिताफळ ही फळे एकाच वंशाची असल्यामुळे या सर्वांची चव सारखीच असते. लाल सिताफळ, पिवळे सिताफळ, बालानगर, पिहाड़, काकाल वॉशिंग्टन, बार्बाडोस, गियाना, अनोना 2, धारूर 6, आरका सहान APK1 आफ्रिकन प्राईड, फुले पुरंदर, NNO11, मॅमाथ इ. जातीची सिताफळे भारतात प्रचलित आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भात प्रचलित असलेले बालानगर, धारूर 6, N NO11 या जाती मुख्यत्वे जास्त चालतात.

♦️ जमिनीची मशागत :भारी किंवा मध्यम स्वरूपाची पाण्याचा निचरा होणारी जमिन या पिका करीता अति उत्तम असते. जमिनीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास या पिकाला डायबॅक हा रोग होऊ शकतो. सखोल उभी व आडवी नारंटी करून कुळवांच्या 3 ते 4 पाळ्या कराव्यात. शेवटच्या पाळी पूर्वी प्रति एकरी शिंपून शत्रु किटकाचे कोष नष्ट करण्याचे कार्य करावे.

(प्रमाण : प्रति एकर)

जय संजीवनी

5 किलो

सिंगल सुपर फॉस्बेट

1 बॅग


♦️ लागवड अंतर :12 x 12 (302 झाडे), 16 x 8 (340 झाडे), 14 x 14 (222 झाडे)
♦️वरील तीन्ही पैकी कोणतेही पध्दत घेतल्यास लागवड योग्य प्रकारे करता येईल.

♦️ लागवड पध्दत :1 x 1 x 1 मी चा खड्डा करून घ्यावा

( प्रमाण प्रति - 1 झाड )

शेणखत (प्रक्रिया केलेले)

500 ग्राम

निबोळी पेंड

250 ग्राम

सिंगल सुपर फॉस्फेट

250 ग्राम

सुफर्ट

200 ग्राम

ब्लॅकडायमंड

200 ग्राम

वरील प्रमाणे खताचे मिश्रण करून गड्डा भरावा.

♦️ रोप प्रक्रिया :लागवड करण्यापूर्वी

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

100 ग्राम

बाविस्टीन

50 ग्राम

♦️प्रति 15 लीटरचे प्रमाण घेऊन बुडापासून शेंड्यापर्यंत फवारणी करावी. नंतर खड्याच्या मधोमध रोप लावावे.

पहिल्या वर्षाचे नियोजन

♦️ खताची पहिली मात्रा :सिताफळ बागेत मोकळ्या जागेत खरीप हंगामात मूग, उडिद, चवळी, तीळ, व भुईमूंग ही पिके सुरुवातीच्या दोन वर्षापर्यंत घेता येतील. आणि रब्बी हंगामात हरभरा घेता येतो. लागवडी पासून 7 ते 11 दिवसाच्या दरम्यान पहिली आळवणी

( प्रति एकरी सोडावे )

स्कायगोल्ड जेल

1.5 किलो

ब्लुकॉपर

500 ग्राम

19:19:19

3 किलो

♦️ पहिली फवारणी :लागवडी पासून 22 ते 24 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मिली

रोको

20 ग्राम

सिताफळ या पिकावर साधारणतः कोणताही रोग येत नाही. तरी वेळोवेळी किटकनाशकाच्या फवारण्या करू नये.

♦️ दुसरी आळवणी :लागवडी पासुन 35 ते 40 दिवसानी आळवणी करावी. ठिबक द्वारे प्रति एकर सोडवे किंवा आळवणी करावी.

मिरॅकल

1 लिटर

सुप्रीमो

2 लिटर


♦️ पहिला खताचा डोस :लागवडी पासून 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान खताचा डोस दयावा.

( प्रति एकर प्रमाण )

ब्लॅक डायमंड

10 किलो

सुफर्ट

10 किलो

20 : 20 : 0 : 13

1 बॅग

♦️ टीप :वरील पद्धतीने केलेले नियोजन बहार धरण्यापूर्वी प्रत्येक वर्षी करावे.

बहार नियोजन (वर्षे 3 रा)

♦️सर्वात सुरुवातीला बहार घेण्यापूर्वी खताचा भेसळ डोस व्यवस्थित टाकणे आवश्यक असते. या वेळेस खालील प्रमाणे खत द्यावे. या सर्वांचे व्यवस्थित मिश्रण करून रिंगण पद्धतीने खत टाकावे. या नंतर पाणी द्यावे

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅकडायमंड

10 किलो

निबोंळी पेंड

1 बॅग

♦️त्यानंतर फवारणी आपल्या बागेत दोन चार कळी दिसल्यानंतर खालील प्रमाणे फवारणी करावी.

अविष्कार

5 मिली

शक्तिमान गोल्ड

25 मिली

माईट-शूट

25 मिली

♦️15 लिटर प्रती पंप एकरी फवारणी करावी. पाण्याचे नियोजन जमिनीच्या पोत प्रमाणे करावे.

♦️फळाचा आकार लिंबू एवढा झाल्यावर खालीस फवारणी करावी

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

जीब्रॅक्स

40 मिली

फ़ायर - 101

25 मिली

♦️यापुढे फळाला चकाकी यावी वजन वाढव गर चांगल्या प्रकारे भरावा. यासाठी खालील घटक सोडावे.सुप्रीमो - 2 लिटर

♦️ टीप :आपल्या फळावर मिलीबग अथवा अळीचा प्रादुर्भाव आढल्यास

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

सोनाटा -70

35 मिली

रोको

25 ग्राम