सोयाबीन
Category
तेलबिया
सोयाबीन नियोजन
♦️ सोयाबीन पिकाची लागवड :मजुरांची कमतरता व त्रास, उत्पादनात ह्रास या कारणाने कापूस पीकाला फाटा देत अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. विदर्भ व मराठवाडा या विभागात सोयाबीन हे पिक मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पिकानंतर रब्बी मध्ये दुसरे पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे जास्त झाला आहे.
मित्रांनो 6 ते 8 क्विंटल एकरी सोयाबीन उत्पादन घेणारे शेतकरी तंत्र वापरून 12 ते 20 क्विंटल पर्यंत सोयाबीन उत्पादन घेतांना दिसून येत आहे. सोयाबीन नंतर हरभरा व त्या नंतर उन्हाळी तीळ असे तिहेरी पिक माझ्या मार्गदर्शनात मागील 4 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. सोयाबीन- 12 ते 20 क्विंटल, हरभरा 12 ते 18 क्विंटल व तीळ - 6 ते 10 क्विंटल पर्यंत शेतकरी घेत आहेत.
♦️ 1. जमिनीची मशागत :सखोल नांगरणी करून 40 - 45 दिवस जमीन चांगली तापू द्यावी. जमिनीत असणारे शत्रू कीटकांचे कोष जसे चक्रीभुंगा, खोडकिडा, खोड आळी, शेंगा पोखरणारी आळी, उंटआळी, पाने खाणारी आळी यांचे कोष नष्ट करावे या करिता जय संजीवनी - 5 किलो व सुपर फॉस्पेट - 1 बॅग शेतामध्ये शिंपून हे कार्य करू शकता.
♦️ 2. वाणाची निवड :पिके 472, जे.एस -335, फुले कल्याणी, ग्रीन गोल्ड, फुले किमया, रुची 1001, जे एस 9305, के. डी. एस 103, के. डी. एस 225 या पैकी वाण निवडावे. (घरचे बियाणे असल्यास प्राधान्य द्यावे. परंतु 2 वर्षा पेक्षा जास्त जुने बियाणे घेऊ नये व 100 दाणे घेऊन उगवण शक्ती तपासून घ्यावी.)
♦️ 3. बियाणे प्रक्रिया :भारी जमीन असल्यास एकरी 15 किलो व मध्यम किवा हलकी जमीन असल्यास एकरी 20 किलो बियाणे घ्यावे. बियाण्यास पुढील प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. पहिल्या दिवशी बियाणे तप्पड वर टाकून
स्कायगोल्ड जेल- 100 ग्राम + ब्लू कॉपर- 50 ग्राम
500 मीली पाण्यात द्रावण करावे व बियाण्यावर शिंपडावे व फारी/ तप्पड हलवून बीज प्रक्रिया करून घ्यावी व रात्रभर बियाणे वाळवून घ्यावे.
♦️ 4. अंतर :भारी व काळीची जमीन असल्यास 2 सऱ्यामधील अंतर 2 फुट ठेवावे. मध्यम व हलक्या जमिनीत हे अंतर 1.5 फुट ठेवावे. आंतरपीक तूर लावावयाची असल्यास हे अंतर 6:1 किवा 8:1 असे ठेवावे .
♦️ 5. खत व्यवस्थापन :पेरणी सोबतच पुढील प्रमाणे खत टाकावे.डी.ए.पीकिवा20:20:0:13 -1 बॅग, सुफर्ट -10 किलोवब्लक डायमंड - 10 किलो.
♦️ 6. पहिली डवरणी :पेरणी पासून 15-20 दिवसांत करावी व दुसरी डवरणी पेरणी पासून 30-35 दिवसांत करावी.
♦️ 7. तन नाशक फवारणी :पेरणी पासून 15 ते 20 दिवसांत ताननाशकाची फवारणी करावी मात्र प्रत्येक टाकीतस्कायगोल्ड जेल - 20 ग्रामटाकावे किवाकॅप्टन - 30 मीलीटाकावे. म्हणजे आपल्या पीकाला तणनाशकामुळे होणारे नुकसान टाळता येते. आवश्यक असल्यास 1 - 2 वेळेस निन्दन करून घ्यावे व होता होईस्तर तणनाशक फवारणी टाळावी.
♦️ 8. पहिली फवारणी :पेरणी पासून 20 ते 24 दिवसांत पहिली फवारणी पुढील प्रमाणे करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
एलीयट | 15 ग्राम |
या फवारणी मुळे पांढर्या मुळ्या सुदृढ होऊन फळ फांद्या भरपूर फुटतील.
♦️ 9. दुसरी फवारणी :पहिली फवारणी झाल्यानंतर लगेच 7 व्या दिवशी करावी.चाम्पियन - 1 मीली, गोल्ड रूट टबलेट - 1 गोळी, फायर 101 - 25 मीलीहि फवारणी झाल्यानंतर आपल्या पीकाला उप फळ फांद्या मोठ्या प्रमाणात फुटण्यास मदत होईल व कोणत्याही प्रकारची आळी येणार नाही.
♦️ 10. तिसरी फवारणी :आपले अंतर 2 फुटाचे असल्यास लागवडी पासून 35 दिवसालाफोटान - 7 मीली, वीगो-25 ग्राम व मार्शल -25 मीलीप्रती पंप फवारणी करावी. हि फवारणी झाल्यानंतर आपणास चमत्कार पाहण्यास मिळेल.
♦️ 11. चवथी फवारणी :आपल्या पिकावर 10 - 20 फुले दिसल्या नंतर लगेच पुढील प्रमाणे फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तिमान गोल्ड | 25 मी.ली |
प्रोक्लेम / प्रोक्टीन | 10 ग्राम |
हि फवारणी केल्यानंतर 8 - 10 दिवसांत आपल्या पिकावर भरपूर फुले लागलेली दिसतील .
♦️ 12. शेवटची फवारणी :हि फवारणी चपली बनत असतांना करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
जीब्रॅक्स | 25 मीली |
फायर 101 | 25 मीली |
♦️ 13. अधिक माहिती :सोयाबीन पिकावर येणारे किडी - खोड आळी, खोड किडा झाडा वरील शेंडा सुकून झाड खालपर्यंत सुकत जाणे, झाड उपटून व चिरून पाहिल्यास आतील गाभ्यात आळ्या दिसतात. चक्रीभुंगा पिकाच्या शेंड्याला 2-3 इंच खालून डंख मारून रस शोसून घेतो व शेंडा गळून पडतो. उंट आळी, केसाळ आळी, शेंगा पोखरणारी आळी, पाने कुरतडणारी आळी तसेच यलो मोजक व बुरशीचे ठिपके वरील प्रमाणे पिकावर प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते.
♦️ टीप :येलो मोजॅक दिसून आल्यास ताबडतोप गो मोजॅक या घटकाची फवारणी करावी