तीळ

तीळ

Category

तेलबिया

तीळ

तीळ पिक नियोजन

मित्रांनो माझा एक अभ्यास असा आहे कि रोग आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोगच येवु नये ही काळजी घेतली तर उत्पादनात यश येते. तिळ हे पिक आपल्या विदर्भ व मराठवाड्यातुन लोप पावत चालले होते. परंतु मागील दोन वर्षापासून बरेचसे शेतकरी माझ्या तंत्रानुसार सोयाबीन नंतर हरभरा नंतर तिळ असे तिहेरी पिक घेत आहेत. एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत सोयाबीन, 12 ते 18 क्विंटल पर्यंत हरभरा व 6 ते 10 क्विंटल पर्यंत तिळ असे तीन पिक एकाच एकर मधुन घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडली आहे.

♦️ जमिनीची मशागत :हरभरा काढल्यानंतर जमिनीची चांगल्या प्रकारे वखर पाळी करुन घेतल्यानंतर दोन सरीमधील अंतर 2.5 ते 3 फुट ठेवावे. आपल्या दोन रोपा मधील अंतर 6 इंच ठेवावयाचे आहे हे लक्षात ठेवावे.

♦️ बियाणे निवड :बाजारात उपलब्ध असलेले संशोधित जातीचे बियाणे आपल्या आवडीनुसार घ्यावे. अथवा घरचे बियाणे असल्यास ते सुध्दा घेवु शकतात. प्रति एकरी दिड ते दोन किलो बियाणे घ्यावे.

♦️ बिज प्रक्रिया :एकरी 2 किलो बियाणे घेणे :स्कायगोल्ड जेल - 30 ग्राम + बावीस्टीन 30 ग्रामयांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळू देणे.

♦️ खताची पहिली मात्रा :खताची पहिली मात्रा पेरणी सोबतच द्यावी

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो


♦️ पहिली फवारणी :लागवडीपासुन 16 ते 18 दिवसात फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

रोको

20 ग्राम

फायर 101

25 मि.ली

♦️या फवारणी नंतर लगेच 7 व्या दिवशीचाम्पियन - 1 मीलीगोल्ड रूट टाब्लेट - 1 गोळीयाची फवारणी करावी.

♦️ दुसरी फवारणी :पेरणी पासुन 32 ते 36 दिवसात किवा फुले दिसू लागताच एकरी 30 किलो युरिया शिंपुन पाणी देणे व दुसरी फवारणी लगेच करणे.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

एलीयट

20 ग्राम

अविष्कार

5 मि.ली

शक्तिमान गोल्ड

25 मि.ली

सोनाटा 70

25 मि.ली


♦️ तिसरी फवारणी :55 ते 60 दिवसात पाणी देवून फवारणी

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

जीब्रॅक्स

25 मि.ली

संपदा

25 ग्राम


♦️ अधिक माहिती :या पिकावर थायलेडी, अनुजीवी ठिंबके व मररोग तसेच रोप कुरतडणारी काळी अळी यांचा प्रादुर्भाव होतो. फवारण्यामध्ये याचा विचार केलेला आहे.