बियाणे कांदा

बियाणे कांदा

Category

व्यावसायिक पिके

बियाणे कांदा

बीयाणे कांदा तंत्र

♦️कांदा बियाणे काढण्यासाठी जमिन भारी, काळी किंवा मध्यम असावी. आडवी उभी नांगारटी करून व रोटर करून वखरपाळी करून जमिन तयार करावी. प्रती एकरी 13 ते 14 क्विंटल टोळ घ्यावे. 1 रुपयाच्या आकाराची चकती काढून घ्यावी व खालील प्रमाणे टोळ प्रक्रिया करावी.

स्काय गोल्ड जेल

100 ग्राम

बाविस्टीन

100 ग्राम

फायर 101

50 मिली

यांचे 100 ली द्रावण तयार करून त्यातून 4 क्विंटल टोळ ढवळून काढावे व शिल्लक पाणी शेतात शिंपून दयावे. या पद्धतीने 13 क्विंटल टोळ ढवळून काढून घ्यावे. त्यानंतर दोन सरी मधील अंतर किमान 3 फूट धरावे व टोळ लागवडी करीता किमान अंतर 1 फूट धरावे, या पध्दतीत किमान 13 क्विंटल टोळ प्रती एकरी लागवड करावी.

♦️ पहिली आळवणी :लागवडी नंतर 7 व्या दिवशी पहिली आळवणी (ड्रीचींग) करावी. प्रती 15 ली पंपाने नोझल काढून धार सोडावी.

स्काय गोल्ड जेल

100 ग्राम

ब्लू कॉपर

100 ग्राम

फायर 101

50 मिली


♦️ पहिली फवारणी :पहिली फवारणी 12 ते 14 दिवसात करावी.

( प्रमाण : प्रति १५ लिटर पंप )

स्काय गोल्ड जेल

25 ग्राम

मॅकल्पस

5 मिली

फायर 101

25 मिली

रण 80

5 मिली


♦️ पहिला खताचा डोस :

( प्रमाण : प्रति एकर )

डी.ए. पी

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅकडायमंड

10 किलो

पोटॅश

25 किलो


♦️ दुसरी फवारणी :24 ते 28 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति १५ लिटर पंप )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

वीगो

25 ग्राम

रण 80

5 मि.ली


♦️जर कडा सुकून करपा येत असेल तर रोको ऐवजी ॲमेस्टार टॉप 15 ग्राम घेवून फवारणी करावी.

♦️ खताचा दुसरा डोस :लागवडी पासून 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान दुसरा खताचा डोस दयावे.

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

विघ्नहर्ता विकास कीट

25 किलो


♦️ तिसरी फवारणी :55 ते 60 दिवसाने करावी.

( प्रमाण : प्रति १५ लिटर पंप )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मिली

फायर-101

25 मि.ली

रन 80

5 मिली


♦️ चौथी फवारणी :दाण्याचा आकार व साईज वाढवण्यासाठी फूलधारणा झाल्यावर ही फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति १५ लिटर पंप )

बलवान

25 मिली

जीब्रॅक्स

25 मिली

यु.पी.एल कंपनीचे चे साफ

25 ग्राम


♦️ टिप :कांदा पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्यास प्रत्येक वेळेसमाईट शूट - 25 मिलीप्रती पंप फवारणी मध्ये घेवू शकता. पिकावर पुगळी रोग दिसल्यासडेटासू - 100 ग्राम, क्लोरो 20% - 25 मिलीतेजस - 25 ग्रामप्रती पंपाने फवारणी करावी.