धान तंत्र (तांदूळ)

धान तंत्र (तांदूळ)

Category

व्यावसायिक पिके

धान तंत्र (तांदूळ)

धान तंत्र



शेतकरी बंधुनो.....!

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन घेतल्या जाते. विशेषता विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, साकोली, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे पिक घेतल्या जाते.

कमी तापमानात येणारे हे पिक चांगल्या पैकी उत्पन्न देणारे पिक आहे. परंतु तंत्राप्रमाणे घेतल्यास उत्पनात भर पडते. अनेंक प्रकारच्या जाती धान पिकामध्ये पाहावयास मिळतात. शेतकरी वेगवेगळ्या जाती निवड करीत असल्यामुळे विशिष्ट जातीचा उल्लेख करणे चुकीचे ठरेल. म्हणून जात निवडणे हे शेतकरी बांधवांनी ठरविणे योग्य होईल. मात्र मशागती पासून काढणीपर्यंत तंत्राचा वापर केल्यास हमखास उत्पादनात भरघोस वाढ होण्याची शक्यता असते. मी सर्व शेतकरी बांधवाना हे तंत्र बहाल करताना शुभेच्छा देतो.

♦️ जमिनीची मशागत : मे महिन्यात उभी व आडवी नांगरटी करावी. व त्यानंतर खालील प्रमाणे कार्य करावे.

♦️ बोरू शिंपणे : नांगरटी झाल्यानंतर प्रती एकरी 20 ते 25 किलो बोरू शिंपावे. बोरुची वाढ जोमाने होण्यासाठी उगवल्यानंतर त्यावर स्काय गोल्ड जेल -25 ग्रम व मेक प्लस - 5 मिली प्रती पंप फवारणी करावी.

♦️ रोप तयार करणे : जुन महिन्यात एका बांधीमध्ये उंच भागावर रोप वाटिका तयार करणे व त्यामध्ये 15 किलो बियाणे घेऊन स्कायगोल्ड जेल - 100 ग्राम, ब्लूकॉपर - 50 ग्राम व चीलेटेड झिंक - 30 ग्राम घेऊन बीज प्रक्रिया करावी व हे बियाणे बांधीमध्ये शिंपावे. बियाणे मातीचा फेर करून झाकावे जेणेकरून पाखरे बियाणे खाणार नाही

अ) परे टाकणे : मृग नक्षत्रा नंतर परे टाकावे.
आ) पाणी सोडणे : पाऊस लांबल्यास 10-12 दिवसांत पाणी सोडावे.
इ) परे टाकल्यानंतर 15-16 दिवसांत रोपे तयार होत असताना रोपावर फवारणी करावी तेजस - 25 ग्राम, संपदा -25 ग्राम व वीगो - 25 ग्राम या फवारणी मुळे रोपे जोमाने वाढण्यास मदत मिळेल.
ई) रोपे तयार होणे : परे टाकल्यानंतर 35 - 40 दिवसात रोपे तयार होतील.
उ) रोवणी / लागवड : रोप लागवडी पूर्वी चिखल करते वेळेस बोरू चांगल्या प्रकारे दाबावे.
ऊ) एका एकर मध्ये जास्तीत जास्त 8 ते 10 बांधे असावेत. त्यात चिखल तयार करून घेणे.

♦️ खताचा डोस : चिखलणी करताना व रोवणी करण्या पूर्वी खालील प्रमाणे खत टाकावे. 20:20:0:13- 1 बॅग + ब्लक डायमंड - 10 किलो, सुफर्ट - 10 किलो, सिंगल सुपर फॉस्पेट पावडर - 2 बॅग प्रती एकरी टाकावे.

♦️ रोवणी व अंतर : जून किवा जुलै महिन्यात रोवणी करावी. रोवणी करताना किमान 12 इंचाचे अंतर घ्यावे ९ इंचाचे अंतर तंत्रात कमी पडेल याची दक्षता घ्यावी.

♦️ तननाशक फवारणी : रोवणी झाल्यानंतर 42 तासाच्या आत युपीएल कंपनीचे “साथी” हे तननाशक 80 ग्राम पाऊच प्रती एकरी फवारणी करावी. रोवणी पासून 45 दिवसापर्यंत सहसा रुंद पानाचा कचरा/ तन येत नाही. गवत वर्गीय तन असल्यास “नोमिनी गोल्ड” पि.आय कंपनी चे 10 मिली प्रती पंप वापरावे

♦️ खताचा डोस : रोवणी झाल्यानंतर 25 ते 30 दिवसात खालील प्रमाणे प्रती एकरी खताचा डोस द्यावा 20:20:0:13 - 1 बॅग + सुफर्ट -10 किलो + ब्लाक डायमंड -10 किलो.

♦️ पहिली फवारणी : स्कायगोल्ड जेल - 25 ग्राम + मॅकप्लस - 5 मिली + वीगो - 25 ग्राम प्रती 15 लीटर ने फवारणी करावी. 200 लीटर करिता स्कायगोल्ड जेल - 400 ग्राम, मॅकप्लस -80 मिली व वीगो 400 ग्राम घ्यावे.

♦️ निसवा / पोटरी देणे : रोवणी पासून 55 ते 60 दिवसांत निसवा सुरु होतो. या वेळेस कडाकरपा किवा करपा येण्याची शक्यता जास्त असते कारण (आखरपाक) पितृपक्ष पंधरवाड्यात तापमान अतिशय वाढते. या वेळेस खालील प्रमाणे फवारणी करावी
तेजस- 25 ग्राम + संपदा-25 ग्राम + चीलेटेड झिंक - 25 ग्राम + वीगो - 20 ग्राम प्रती 15 लीटर प्रमाणे फवारणी करावी. तसेच तापमान जास्त असल्यास प्रती एकरी 6 लीटर ताक व 2 तोळे हिंग भिजवून आळवणी करावी.

♦️ मावा चिकटा हिरवे/पोपटी तुडतुडे, पांढरी माशी असे काही प्रादुर्भाव पिकावर दिसल्यास व्हिजील - 8 ग्राम व कडूज - 30 मिली प्रती पंप ( 15 लीटर ) फवारणी करावी.

♦️ खताचा दुसरा डोस : रोवणी पासून 60 ते 65 दिवसांत खताचा दुसरा डोस खालील प्रमाणे टाकावा. 10:26:26 - 1 बॅग + युरिया - 25 किलो + विघ्नहर्ता विकास कीट - 25 किलो

♦️ ओंबी येणे : रोवणी पासून 72 ते 75 दिवसांत ओंबी येणे चालू होते. या वेळेस ओम्बीची लांबी वाढवणे व दाण्याची संख्या वाढविणे हे महत्वाचे कार्य आहे. या करिता पुढील फवारणी करावी. बलवान- 25 मिली + ट्रायसायक्ला झोल (नागार्जुना चे) - 10 ग्राम + सुपर प्लस -25 मिली प्रती पंप फवारणी करावी जर मानमोडी किवा काणी चा प्रादुर्भाव आल्यास नियंत्रण होईल.

♦️ खोड किडा : आपल्या पिकावर खोड किडा येत असल्यास रोवणी नंतर 40 ते 45 दिवसांत फार्तेरा/ फार्तैल - 4 किलो प्रती एकरी शिंपावे.

♦️ पिक काढणी पूर्वी पाण्याची पातली 4 ते 6 इंच असावी.