तूर
Category
धान्य पिके
तुर पिकाचे नियोजन
♦️ तुर तंत्र :महाराष्ट्रातील मुख्य व महत्वाचे पिक म्हणजे तुर आंतरपिक म्हणुनच जास्त लागवड केल्या जाते कापुस किंवा सोयाबीन या पिकांमध्ये तुर हे आंतरपीक म्हणुन घेतले जाते. कोरडवाहु व हलक्या किंवा मध्यम जमिनीत लागवड करावयाची असल्यास मध्यम कालावधीचे वाण निवडणे फायद्याचे ठरते. जसे मारोती टि. 21. संपदा नं. 148 व भारी जमिनीत दिर्घ मुदतीचे वाण घ्यावे. जसे आशा, बी. एस. एम. आर. 736, बी. एस. एम. आर 853, सी 11.165 ते 200 दिवसाच्या मुदतीमध्ये तुरीचे पिक काढावण्यास येते.
♦️ बियाणे प्रक्रिया :5 किलो पर्यंत बियाणे घेतल्यासस्कायगोल्ड जेल - 50 ग्रामवबाविस्टीन - 50ग्राम कालवुन बीज प्रक्रिया करणे व बियाणे रात्रभर वाळवून घेणे.
♦️ पेरणी / लागवड :आंतरपीक म्हणुन घेतांना दोन ओळीतील अंतर आपण ठरवावे. मात्र दोन झाडांमधील अंतर 1 फुट ठेवावे. लागवड/पेरणी करतांना बियाणे दाट पडल्यास विरळणी करून घ्यावी. माझ्या तंत्रात दोन ओळीमधील अंतर 12 फुट घेतल्यानंतरही कमी पडले होते.
♦️ पहिली आळवणी (ड्रिंचींग) :पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी ही आळवणी करावी.
(15 लिटर पंप ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
ब्लुकॉपर | 50 ग्राम |
19:19:19 | 100 ग्राम |
ठिंबक असल्यास (प्रती एकरी) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1 किलो |
ब्लुकॉपर | 500 ग्राम |
19:19:19 | 1 किलो |
हे प्रमाण घ्यावे. या आळवणी मुळे तुरीच्या मुळ्या खोलवर जाऊन सोटमुळ सुधृढ होते व उपमुळ्या भरपुर फुटतात म्हणुन मर रोग लागत नाही.
♦️ दुसरी आळवणी (ड्रिंचींग) :पेरणी पासुन 20 ते 24 दिवसांनी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
सुप्रीमो | 200 मिली |
मिरॅकल | 100 मिली |
ठिबक असल्यास (प्रति एकरी) | |
|---|---|
सुप्रीमो | 2 लिटर |
मिरॅकल | 1 लिटर |
♦️ खताची मात्रा :लागवडीपासुन 24 ते 28 दिवसामध्ये खताची पहिली मात्रा द्यावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
♦️ पहिली फवारणी :लागवडीपासुन 28 ते 32 दिवसात पिकाच्या फळ फांद्याची संख्या व लांबी वाढविणे तसेच बुरशीचा प्रार्दुभाव रोखणे गरजेचे असते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5.मि.ली |
नेटीओ | 10 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️अधिक पातळ झाले असल्यास या फवारणी नंतर अधिक फुटवे लागण्यासाठी खालील फवारणी करावी. अधिक फुटवे मिळण्यासाठी मदत होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
चॅम्पियन | 1 मिली |
रूट गोल्ड टॅबलेट | 1 |
♦️ खताची दुसरी मात्रा :पिकावर 2/4 फुले दिसल्यास 10:26:26 1 बॅग, विघ्नहर्ता विकास कीट 25 किलो यांचे मिश्रण देवुन पाणी सोडावे व फवारणी करावी.
♦️ दुसरी फवारणी :खालील प्रमाणे करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मी.ली |
शक्तिमान गोल्ड | 25 मि.ली |
एलीयट | 20 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️या फवारणी नंतर 5 दिवसाच्या अंतराने, प्रती पंप फवारणी केल्यास पुन्हा अधिक शेंगा लागण्यास मद्त होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
फ्लॉवर किंग | 1 मिली |
प्रोक्लेम | 10 ग्राम |
♦️ नोट :दमट हवामान, धुवारी / धुके किंवा ढगाळ वातावरण असल्यास दुसऱ्या दिवशी खालील फवारणी करावी फुलगळ होणार नाही.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
बलवान | 25 मिली |
वीगो | 25 ग्राम |
बाल बोरॉन | 30 ग्राम |
प्लॅनोफिक्स | 5 मिली |
♦️ तिसरी फवारणी :चफली बनत असताना शेगांची लांबी वाढविणे, दाण्याची संख्या वाढविणे व दाण्याचा आकार वाढवुन चमक निर्माण करण्याचे कार्य करावे लागते. अशा वेळेस पुढील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
जीब्रॅक्स | 25 मिली |
फायर 101 | 25 मिली |
♦️भुंगेरे, पतंगे, शेगंमाशी, शेगां पोखरणारी अळी यांचा बंदोबस्त या फवारणीतून करता येतो. तुर पिकाला 20 ते 25 दिवसात पहिली व 35 ते 40 दिवसात दुसरी कोळपणी करावी. तरच जमिन भुसभुशीत राहते व जमिनीत हवा खेळती राहते त्यामुळे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. जमिन तण विरहीत ठेवावी. पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास 30 ते 45 दिवसांत व नंतर 60 ते 70 दिवसात व शेंगा भरावयाच्या अवस्थेत पाणी द्यावे.
तुरीवरील किडी व रोग
♦️किडी : घाटे व शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, खोड माशी, ढेकुण.
♦️रोग : मर रोग, करपा, मुळ कुजव्या, भुरी, पानावरील ठिपके, पाना वरील करपा, तांबेरा, वाझ रोग.
वरील सर्व किडी व रोगांचा विचार करुनच तंत्रामध्ये फवारण्यांचे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहे.