संत्रा
Category
फळबाग
संत्रा लागवड
संत्रा फळ हे लिंबूवर्गीय फळा मध्ये मोडतो. आंबट गोड चव असलेले हे फळ प्रामुख्याने उन्हाळ्यात भरपूर मागणी तयार करते. संत्रा रसाला सुद्धा उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. अधिक श्रम किंवा व्यायाम केल्यामुळे येणारा थकवा घालविव्यासाठी संत्र्याचे रस अधिक उपयुक्त ठरते. शारीरिक आळस मरगळ आणि प्रवासातील थकवा तसेच बौध्दीक थकवा घालवण्यासाठी संत्राच्या रसाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. जिवनसत्व अ', ब, असलेले हे फळ मानवी शारीराकरीता अतिशय उपयुक्त आहे.
♦️ हवामान :अनेक वर्षापर्यंत टिकाऊ असणारे हे झाड उच्च तापमानात सुध्दा तग धरून राहते. सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला तर झाडांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते. हवेतील आद्रता अधिक ढगाळ हवामान झाडाच्या वाढीकरीता व फळाच्या वाढीकरीता घातक ठरते.
♦️ जमिन :जमिनीची निवड करताना खालील बाबी लक्षात आणाव्यात.
♦️ 1. पाण्याचा निचरा :जमिनीच्या खालच्या थरातून पाण्याचा निचरा होणे अतिशय महत्वाचे आहे. झाड मोठे वाढत असल्यामुळे त्याच्या प्रमाणेच झाडाच्या मुळ्या सुध्दा खोलवर जातात. ज्या जमिनीत खालच्या थरातील पाण्याचा निचरा होत नसेल तर पांढऱ्या मुळ्याजवळ बुरशी तयार होऊन मुळ्यामध्ये गाठी तयार होतात व पिकाला हानी पोहचते. तसेच मुळकुज लागूण झाड मर होऊ शकते.
♦️ 2. क्षारता :जमिनीत एकूण क्षाराचे प्रमाण 1000 पि.पि.एम पेक्षा अधिक असते. अशा जमिनी संत्रा लागवडीस अयोग्य समजाव्यात. यामुळे सुध्दा मोठ्या प्रमाणात झाडाची मर होण्याची शक्यता असते.
♦️ 3. रोग-किडीचा प्रादुर्भाव :जमिनीत काही उपद्रवी बुरशी, किड, निम्याटोड (सुत्रकृमी) असल्यास त्यांचा उपद्रव झाडाला होतो व खोडकिडा, खोडअळी व उधळी हे पिकाकरता घातक ठरते. तेव्हा जमिन निवडताना लक्षात घ्याव्यात.
♦️ 4. जाती निवड :क्लिमेंटाईन, कलमोडिन, क्लियोपात्रा, कुर्ग, डान्सि, देशी, किंग, नागपूर संत्रा, सातसुमा, टेम्पले. विलोलिफ इ. जाती प्रचलित आहेत. भारतातील नागपुरी संत्रा प्रसिद्ध गणला जातो.
♦️ 5. जमिनीची मशागत :संत्रा पिकाची लागवड करण्याअगोदर जमिनीची आडवी उभी सखोल नांगरटी करून घ्यावी. यानंतर कुळव्याच्या दोन ते तीन पाळ्या कराव्यात. शेवटच्या पाळी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग व जय सजिवंनी 5 किलो यांचे मिश्रण प्रति एकरी शिपांवे व जमिनीचे सपाटीकरण करून घ्यावे. प्रत्येक क्षेत्रात ठरावीक उतार राखूनच सपाटीकरण करावे, जेणे करून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. (हराळी, नागरमोथा, कास, कुडा या बारमाही तणाच्या मुळ्या काढाव्यात.)
♦️ रोप प्रक्रिया :या दोन्ही घटकाचे 100 लिटर पाणी तयार करून रोपप्रक्रिया करून घ्यावी.
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
बाविस्टिन | 100 ग्राम |
♦️ लागवड अंतर :जमिनीच्या मगदुरानुसार चौरस पद्धतीने आखणी करावी. 16 x 16 किंवा 18 x 18 फूट किंवा 6 x 6 मीटर वर 1 x1 x 1 मीटरचे खडडे करावे व या खड्यामध्ये या सर्व घटकाचे मिश्रण करून खड्डे भरावे. व त्यामध्ये मधोमध रोप लावावे. मुख्यतः रोप लागवड करण्याचा कालावधी मृग नक्षत्रात सात जून नंतरच करावा.
( प्रमाण प्रति : झाड ) | |
|---|---|
प्रक्रिया केलेले शेणखत | 1 किलो |
निंबोळीपेंड | 1 किलो |
सुफर्ट | 200 ग्राम |
ब्लॅकडायमंड | 200 ग्राम |
प्रथम वर्षे नियोजन
♦️लागवडी पासून 11 ते 16 दिवसात पहिली ड्रिंचीग करावी. ठिबक असल्यास खालील घटक सोडावे.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1.5 किलो |
ब्लू कॉपर | 1 किलो |
12 : 61 : 0 | 3 किलो |
♦️यानंतर दुसरी ड्रिचिंग 40 ते 45 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
सुप्रीमो | 2 लिटर |
मिरॅकल | 1 लिटर |
♦️ पहिली फवारणी :लागवडी पासून 60 ते 70 दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
रोको | 20 ग्राम |
♦️ दुसरी फवारणी :150 ते 180 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
फायर-101 | 25 मि.ली |
♦️ टिप :वरील प्रमाणे खताचा डोस देऊन लगेच पाणी दयावे व पाणी दिल्यावर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने खालील फवारणी करावी.
♦️झाडांना अतिवृष्टीमुळे मर लागत असल्यास नंबर 1 वर दिलेली ड्रिचिंग परत करावी.
♦️धुके किवा धुवारी पडत असल्यास शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस धुपन करावे. दुसऱ्या दिवशी खालील फवारणी करावी.
(15 लिटर प्रती पंप ) | |
|---|---|
बलवान | 25 मि.ली |
साफ | 25 ग्राम |
द्वितीय वर्षे नियोजन
♦️मृग नक्षञाच्या वेळी म्हणजे 7 ते 8 जून दरम्यान शेतकरी बाधंवानी खालील व्यवस्थापन करावे.
♦️ खत व्यवस्थापन :
( प्रमाण प्रति झाड ) | |
|---|---|
डि.ए.पी | 100 ग्राम |
ब्लॅकडायमंड | 100 ग्राम |
सुफर्ट | 100 ग्राम |
♦️वरील खत व्यवस्थापन दोनदा म्हणजे 6 महिन्यात एकदा करावे.
♦️ फवारणी :प्रथम वर्षे प्रमाणेच पहिल्या दोन फवारण्या कराव्यात.
आंतर पिके व आंतर मशागत
♦️संत्रा लागवड केल्यानंतर आपण 5 व्या वर्षी बहार धरू शकतो. तो पर्यंत पहिले 4 वर्षे आपण खालील आंतरपिके घेऊ शकतो. 1 ते 4 वर्षे भुईमूंग व हरभरा - उन्हाळी भुईमूग व हिवाळी हरभरा घेता येईल किंवा पहिले 3 वर्षे लसूणघास घेता येईल. किंवा भाजीपाल्यामध्ये लसूण, कांदा, मिरची, कोबी, टोमॅटो व तसेच फुलाची पिके झेंडू निशिगंध, शेवती, मोगरा इ. घेता येतील, पंरतू आंतरपिके घेताना संत्रा पिकावर रोग व किडी वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
♦️ टणी :संत्रा पिकाच्या झाडाला लहानपणा पासूनच छाटणी करून योग्य वळण दयावे. पंरतू नियमित छाटणी करण्याची गरज नाही. आवश्यकता असेल तेथेच छाटणी करावी, म्हणजे पानकोब (वॉटरशूट), मर, रोगट भाग काढून टाकण्यापुरते छाटणी मर्यादीत असावी. छाटणीचे काम झाड सुप्त आवस्थेत असतानाच करावे व तेथे बोर्डोपेस्ट लावावा. खोडावरील फुट वाढू नये यांची काळजी घ्यावी.
फळ बहार नियोजन
♦️फळ बहार घेण्यापूर्वी झाडाला ताण बसणे आवश्यक असते ताण व्यवस्थित बसत नसेल तर बहार धरण्याच्या 1 मिहिन्या अगोदर खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
संपदा | 25 ग्राम |
13 : 40 : 13 | 100 ग्राम |
0 : 52 : 34 | 100 ग्राम |
आंबिया बहार व्यवस्थापन
♦️ खत व्यवस्थापन :या पिकावर पिठ्या ढेकूण, फळमाशी, सालपोखरणारी अळी, देवी रोग इ. मुख्य रोग आहे. परंतु आपल्या फवारण्यामध्ये यांचा विचार करण्यात आलेला आहे. एकंदरीत पेरूचे पिक अंत्यत लाभदायक व फायदेशीर ठरू शकते जर योग्य प्रकारे नियोजन केले तर उत्पादन भरघोस येऊ शकतो.
( प्रमाण प्रति झाड ) | |
|---|---|
18 :46 : 0 | 500 ग्राम |
निबोळी पेंट | 500 ग्राम |
पोटॅश | 200 ग्राम |
सुफर्ट | 150 ग्राम |
ब्लॅकडायमंड | 150 ग्राम |
♦️वरील खत दिल्यानंतर हलके पाणी देणे व 12 ते 15 दिवसात खालील फवारणी करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तिमान गोल्ड | 30 मि.ली |
फायर-101 | 25 मिली |
बॉल बोरॉन | 25 मिली |
♦️45 ते 60 दिवसात दुसरी फवारणी करावी. या वेळेस फुलगळ होण्याची शक्यता असते.
♦️ दुसरी फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
प्लॅनोफिक्स | 4 मिली |
संपदा | 30 ग्राम |
कॅल्शियम EDTA | 15 ग्राम |
तेजस | 25 ग्राम |
♦️यानंतर फुलाचे रुपांतर गुंडी मध्ये होते. गुंडी अवस्थेमध्ये पांढ़री माशी पिवळा कोळी, लाल कोळी, मावा, तुडतुडे इ. किटकाचा प्रादुर्भाव होत असतो. अश्या वेळेस पिवळा कोळी, लाल कोळी याकरता ओमाईट (धानूका कंपनीचे प्रति पंप 25 मि.ली किंवा बोस्निव्हो (सुमोटूमो कंपनी 15 मि.ली) किंवा डायकोफॉल (कोणतीही कंपनी 30 मि.ली) किंवा इथिऑन 30 मिली किंवा ऑबॉसिन 15 मिली. वरील पैकी कोणताही एक घटक आपल्या फवारणी मध्ये मिश्रण करून फवारणे. सर्वात उत्तम म्हणजे माईट शूट - 25 मीली.
♦️मावा तुडतुडे, व पांढरी माशी याकरता कॉन्फ़िडर, ॲडमायर, उलाला, मार्शल, रिजेन्ट किंवा व्हिजील - 8 मी.ली यापैकी कोणताही घटक वापरू शकतो. तसेच थ्रीप्स मोठ्या प्रमाणावर आढळल्यास किंगकोंग-25 मिली प्रती पंप वापरावे.
जून- जुलै फळ फुगवण अवस्था
♦️या वेळेस खालील प्रमाणे खताचा डोस
( प्रमाण प्रति झाड ) | |
|---|---|
पोटॅश | 500 ग्राम |
ब्लॅकडायमंड | 200 ग्राम |
सुफर्ट | 200 ग्राम |
♦️त्यानंतर फळ फुगवणी साठी खालील फवारणी करावी
♦️ दुसरी फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
जिब्रॅक्स | 30 मि.ली |
बॉल बोरॉन | 25 मि.ली |
♦️या वेळेस फळमाशी मोठ्या प्रमाणात आपल्या बागेमध्ये येत असते. अशा वेळेस फेन्डॉल 25 मिली किंवा मिओथ्रिन 20 मिली आपल्या फवारणी मधून घेता येईल. फळ फुगवणीच्या वेळेस सुप्रीमो 2 लिटर प्रति एकरी सोडावे. याचा आपल्या पिकाला फार मोठा फायदा होतो.
♦️ टिप :फळमाशी करता एका प्लॉट मध्ये 6 ते 8 ठिकाणी मक्षिकार + नुआन किंवा क्लोरो या दोन्ही घटकाचे वेगळेवेगळे बोळे तयार करून कागदाच्या प्लेट मध्ये ठेवावे यामुळे नर पतंगे आकृष्ट होऊन मरण पावतील व प्रजनन होणार नाही.
♦️ सिट्रसशीला :संत्रा पिकावरील प्रमुख किंड महणून या किडीचा उल्लेख केला जातो. सिट्रस वर्गातील संत्रा, मोसंबी आणि इतर झाडावरही किड आढळते. तीन ते चार mm आकाराचे किडी करड्यारंगाचे पंख असलेले असतात. मादी किडी एका दिवसात 700 ते 800 अंडे देते. एका आठवड्यात अंडे उगवून व 15 दिवसात किडीस पंख फुटुन ती उडू लागतात व पिक धोक्यात आणतात. पाने फुले कोवळी शेंडे फळे यातील रस शोषून घेतल्यामुळे मोठे नुकसान होते. अश्यावेळेस माईट-शूट 25 मिली प्रति पंप आपल्या घटका सोबत फवारणी केल्यास या किडीचा नायनाट होतो.