पेरू
Category
फळबाग
पेरु उत्पादन तंत्रज्ञान
गरीब व श्रींमत सर्व स्थरातील लोकांना पेरू फळ प्रिय आहे. या फळापासून जॅम, जेली, चिज , आईस्क्रीम व शरबत तयार करता येते. कमी पाण्यावर येणारे हे पिक आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असते. उष्ण समशितोष्ण हवामानात झाडाची वाढ चांगली होते. कोरड्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशात पेरूचे उत्पादन चांगले होते. दमट हवामानात पेरूची लागवड करू नये. कारण अश्या हवामानात देवीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
♦️ जमिनीची निवड :हलकी, मध्यम व काळी कोणत्याही प्रकारची जमिन पण पाण्याचा निचरा चांगला होणारी जमिन पेरुस मानवते. चुनखडीयुक्त जमिनीत पेरूची लागवड करू नये.
♦️ जात निवड :लखनऊ 49 (सरदार), ललीत, तैवान पिंक, थाई 7, VNR वरील जाती महाराष्ट्रात प्रचलित असून बहुतांश भागात लखनौ 49 या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते.
♦️ जमिनीची मशागत :लागवड करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण आवश्यक असते. अश्या वेळेस आडवी, उभी सखोल नांगरटी करून कुळवाच्या 3 तें 4 पाळया देऊन जमिन भुसभुशीत करून शेवटच्या पाळी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग व जय संजिवनी 5 किलो यांचे मिश्रण प्रति एकरी शिंपावे व शेवटची पाळी करावी. यानंतर लागवडीसाठी योग्य अंतर घ्या 6 x 6 मी. वर 1 x1 x1 मी. चे खड्डे करावे. या खड्यामध्ये प्रक्रिया केलेले शेणखत - 200 ग्राम, सुफर्ट - 100 ग्राम, ब्लॅक डायमंड - 100 ग्राम व डी.ए.पी - 100 ग्राम या सर्व घटकांचे मिश्रण घेऊन खड्डे भरावे
♦️ लागवड अंतर :पेरु पिका करीता आज पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळे अंतर घेतलेले दिसून आले. पंरतू सातारा जिल्ह्यातील माईनी मायामी तालुका खटाव येथील माझे शेतकरी मित्र श्री संजय गुदगे यांच्या पेरूच्या बागेतील अंतर झिक झाँक पद्धतीने 12 x 8 व 10 x 8 अगदी योग्य अंतर माझ्या मताने ठरवीलेले आहेत. याशिवाय 10 x 6 व 12 x 6 हे अंतरही आपण करू शकतो.
♦️ रोप प्रक्रिया :खालील घटक घेऊन रोपावर चांगल्या पद्धतीने फवारणी करावी. किंवा 50 लिटर पाणी करून 250 रोपे बुडवून काढावी व हे पाणी शेतात शिंपून द्यावे.
स्कायगोल्ड जेल | 100 ग्राम |
बाविस्टिन | 100 ग्राम |
♦️ पहिली आळवणी :लागवडी पासून 5 ते 10 दिवसा दरम्यान पहिली (ड्रिप/ ड्रिंचींग).
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 1 किलो |
ब्ल्युकॉपर | 500 ग्राम |
19:19:19 | 2 किलो |
♦️ पहिली फवारणी :लागवडी पासून 16 ते 18 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मिली |
रोको | 20 ग्राम |
♦️ दुसरी आळवणी :32 ते 36 दिवसा दरम्यान दुसरी ड्रिचींग करावी
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
मिरॅकल | 1 लिटर |
सुप्रिमो | 2 लिटर |
♦️ खताची पहिली मात्रा :लागवडी पासून 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान करावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
सुफर्ट | 10 किलो |
♦️या पद्धतीने प्रत्येक वर्षी नियोजन करावे व नंतर यावर्षी बहार धरावयाचा आहे यांचे नियोजन खालील प्रमाणे करावे.
पेरू बहार नियोजन
♦️बहार धरण्यापूर्वी बागेस छाटणी करावी छाटणी झाल्यानंतर
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 30 ग्राम |
ब्ल्यूकॉपर | 30 ग्राम |
♦️बाहेर धरण्या खालील प्रमाणे पवारांनी महत्वाची आहे.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मि.ली |
शक्तीमानगोल्ड | 25 मि.ली |
नेटीओ | 10 ग्राम |
माईट-शूट | 25 मि.ली |
♦️ खत व्यवस्थापन :
( प्रमाण प्रति झाड ) | |
|---|---|
18:46:0 | 300 ग्राम |
ब्लॅकडायमंड | 200 ग्राम |
सुफर्ट | 200 ग्राम |
पोटॅश | 200 ग्राम |
♦️कळी अवस्था आल्यानंतर मावा, फळमाशी, फुलकिडे, तशेच साल पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव आढळून येतो अशा वेळेस खालील फवारणी करावी. खालील घटकाची फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
बॉल बोरॉन | 20 मि.ली |
फायर-101 | 25 मि.ली |
♦️फळाचा आकार बोरासारखा बनल्यास 1 लीटर सुडो. 3 किलो गुळ 200 लिटर पाण्यात कालवून 30 तास भिजू घालावे व त्यानंतर 5 लीटर ताक त्यात टाकून ढवळून घ्यावे. यानंतर हे द्रावण ठिबक द्वारे सोडावे. या द्रावणाची फवारणी सुध्दा करू शकतो.
♦️फळांचा आकार लिंबू सारखा झाला असल्यास फळ फुगवणी करीता व चकाकी येण्या करीता खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
अविष्कार | 5 मिली |
जिब्रॅक्स | 40 मिली |
बॉल बोरॉन | 20 मि.ली |
♦️या तीन घटकाची फवारणी करावी. यानंतर ढगाळ वातावरण धुवारी धुके पडत असल्यास या चार घटकाची फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
बलवान | 25 मिली |
वीगो | 25 मिली |
प्लॉनोफिक्स | 5 मिली |
बॉल बोरॉन | 20 मिली |
♦️ खताचा दुसरी मात्रा :खताची दुसरी मात्रा खालील प्रमाणे दयावी.
( प्रमाण : प्रति एकर ) | |
|---|---|
10:26:26 | 1 बॅग |
विघ्नहर्ता विकास कीट | 25 किलो |
पोटॅश | 1 बॅग |
पेरु वरील महत्वाचे किडी व रोग
♦️ टिप :या पिकावर पिठ्या ढेकूण, फळमाशी, सालपोखरणारी अळी, देवी रोग इ. मुख्य रोग आहे. परंतु आपल्या फवारण्यामध्ये यांचा विचार करण्यात आलेला आहे. एकंदरीत पेरूचे पिक अंत्यत लाभदायक व फायदेशीर ठरू शकते जर योग्य प्रकारे नियोजन केले तर उत्पादन भरघोस येऊ शकतो.