हरबरा

हरबरा

Category

धान्य पिके

हरबरा

हरभरा पिक नियोजन

रब्बी पिका मध्ये जास्त प्रमाणात येणारे व उत्पादन खर्च कमी करून भरघोस उत्पादन देणारे पिक म्हणजेच हरभरा आता शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे.

माझ्या तंत्राने 2019-2020, 2020-21,2021-2022 व 2022-23 या चार वर्षात हरभरा पिक घेणारे अनेक जिल्ह्यातील शेतकरी आनंदात आहे. पहिलादांच शेतकत्यांनी हरभरा घाटे मोजणी करुन आनंद व्यक्त केला आहे. आज पर्यंत कधीही हरभरा पिकाची पाहणी करण्यासाठी कोणतेही शेतकरी दुसऱ्याकडे गेले नव्हते. परंतु या वर्षी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या शेतात पिकांची पाहणी करून 600 पासुन 1500 पर्यंत घाटे एका झाडाला मोजले, काही ठिकाणी तर 1600 ते 2000 घाटे एका-एका झाडास लागले होते याचे व्हिडीओ युट्युब ला उपलब्ध आहेत ही एक आनंदाची बाब आहे.

♦️ जमिनीची मशागत :हरभरा पिकाला मर रोग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसुन येते. यवतमाळ जिल्ह्यात डॉलर हरभरा मोठ्या प्रमाणात पेरल्या जातो. यात जवळपास 40% पर्यंत मर होत असते. म्हणुन यात जमिनीची मशागत महत्वाची ठरते.

♦️रोटर किंवा पंजी करण्यापूर्वीजय संजीवनी - 5 किलोसुपर फॉस्पेट - 1 बॅगप्रति एकरी शिंपावे व नंतर पाळी करून घ्यावी.

♦️ बियाणे प्रक्रिया :हलक्या व मध्यम जमिनीकरिता 22 ते 25 किलो बियाणे भारी जमिनी करिता 15 ते 20 किलो बियाणे घ्यावे.

स्कायगोल्ड जेल

100 ग्राम

बावीस्टीन

100 ग्राम (प्रति 15 ते 30 किलो)

अर्धा लिटर पाणी घेवुन दोन्ही घटकाचे द्रावण तयार करावे फारीवर बियाणे टाकुन द्रावण शिंपडावे व फारी हलवावी प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळु द्यावे.

♦️ पेरणी :ओलिताखाली असल्यास व भारी जमिन असल्यास दोन ओळी मधील अंतर दोन फुट व दोन बियाण्या अधील अंतर 8 ते 10 इंच असावे. तसेच कोरडवाहु किंवा मध्यम जमिनीला दोन ओळी मधील अंतर दिड फुट ठेवावे.

♦️ खताची मात्रा :पेरणी सोबतच खालील प्रमाणे खते द्यावी.

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅक डायमंड

10 किलो


♦️ पहिली फवारणी :16 ते 20 दिवसात पहिली फवारणी करावी.

( प्रमाण : 15 लिटर प्रती पंप )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

एलीयट

15 ग्राम

फायर 101

25 मि.ली

या फवारणीनंतर 60 ते 140 फुटवे एका झाडाला फुटावेत.

♦️अधिक पातळ झाले असल्यास या फवारणी नंतर अधिक फुटवे लागण्यासाठी खालील फवारणी करावी. अधिक फुटवे मिळण्यासाठी मदत होते.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

चॅम्पियन

1 मि.ली

रूट गोल्ड टॅबलेट

1

प्रोक्लेम

10 ग्राम


♦️ दुसरी फवारणी :पिकावर 2 ते 4 फुले दिसल्यास 25 ते 30 किलो युरिया शिंपुन पाणी द्यावे.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

अविष्कार

5 मी.ली

शक्तिमान गोल्ड

25 मि.ली

एलीयट

20 ग्राम

फायर 101

25 मीली

♦️हि फवारणी झाल्यानंतर 40% ते 50% घाटे तयार होईपर्यंत पाणी देवू नये. काही शेतकऱ्यांनी 8 ते 10 दिवसानंतर हि फवारनी दुबार केली याचा बराच मोठा फायदा शेतकऱ्यांना दिसुन आला. या शेता मध्ये एकाच झाडाला 800 ते 1200 घाटे दिसुन आले.

♦️या फवारणी नंतर 5 दिवसाच्या अंतराने, प्रती पंप फवारणी केल्यास पुन्हा 700 ते 800 घाटी नवीन लागू शकते

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

फ्लॉवर किंग

1 मिली

फायर 101

25 मिली


♦️ तिसरी फवारणी :30 % ते 40 % घाटे तयार झाले की हि फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

जीब्रॅक्स

25 मि.ली

फायर 101

25 मि.ली

या प्रमाणे नियोजन केल्यास व निर्सगाची साथ मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वाढ होते.

♦️ टिप :पिकामध्ये 10 ते 12 पक्ष्यांचे थांबे थवे बसवावेत म्हणजे अळ्यांचा नायनाट होईल तसेच तांबेरा रोग दिसत असल्यास खालील प्रमाणे फवारणी करावी.

महा झिंक 25 ग्राम + फेरोशील - 25 ग्राम