बाजरी
Category
धान्य पिके
बाजरी पिकाचे नियोजन
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बाजरी पेरणी होत असते. बाजरीची भाकर खाण्यास रुचकर व चविष्ट असते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये बाजरीचे पिक घेतल्या जाते.
♦️ जमिन :चांगले उत्पादन घेण्यासाठी जमिन ढेकळे विरहीत व भुसभुशीत करून घ्यावी.
♦️ बियाणे :बाजारात उपलब्ध असलेले संकरीत सुधारित वाण आपल्या आवडीनुसार निवडावे. परभणीसंपदा, समृध्दी 8203, 1666, शांती 1908हे सुध्दा संकरीत वाण चांगल्या प्रकारचे असतात.
♦️ बियाणे प्रक्रिया :प्रति एकरी 1.5 ते 2 किलो बियाने घेवून मिठाचे 5 लिटर पाणी करून त्यातुन ढवळून काढावे. वरील आलेला कचरा व पोकळदाणे बाजुला काढावे व बाजरी धुवून हडकवुन घ्यावी त्यानंतर
स्कायगोल्ड जेल - 50 ग्राम + बावीस्टीन 50 ग्राम
यांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करून 5 तास बियाणे वाळवुन घ्यावे.
♦️ पेरणी :दोन सरीमधील अंतर किमान 18 ते 24 इंच ठेवावे :
(प्रमाण : प्रति एकर) | |
|---|---|
20:20:0:13 | 1 बॅग |
सुफर्ट | 10 किलो |
ब्लॅक डायमंड | 10 किलो |
♦️पेरणी बरोबच खते द्यावे. दोन रोपांमधील अंतर 4 ते 5 इंच ठेवावे. पेरणी दाट झाल्यास विरळणी करावी. पेरणी एक इंचापर्यंत खोल करावी. खरीपातील पेरणी जास्तीत जास्त 15 जुलै पर्यंत करावी. आंतरपीक म्हणून तुर किंवा मटकी घेता येईल. तुर 4: 2 व मटकी 2:1 चे नियोजन योग्य राहते.
♦️ टिप :तण नाशकाचा वापर बी उगवण्या पुर्वीच करावा. उगवणी झाल्यानंतर तणनाशक फवारु नये खुरपनीच करावी. तन नाशकाच्या प्रत्येक पंपातस्कायगोल्ड जेल - 20 ग्रामकिंवाकॅप्टन - 30 मि.लीटाकावे.
♦️ पहिली फवारणी :पेरणीपासुन 18 ते 20 दिवसात पहिली फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
मॅकप्लस | 5 मि.ली |
रोको | 20 ग्राम |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️पेरणी पासुन 30 ते 35 दिवसात 30 किलो युरिया शिंपुन पाणी द्यावे व दुसऱ्या दिवशी फवारणी करावी.
♦️ दुसरी फवारणी :
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
स्कायगोल्ड जेल | 25 ग्राम |
अविष्कार | 5 मि.ली |
टिल्ट | 20 मी.ली |
सोनाटा 70 | 25 मि.ली |
♦️ तिसरी फवारणी :कणीस भरतांना करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं ) | |
|---|---|
तेजस | 25 ग्राम |
संपदा | 25 ग्राम |
जीब्रॅक्स | 25 मि.ली |
फायर 101 | 25 मि.ली |
♦️ बाजरी पिकावर येणारे रोग :गोसावी, केवडा, अरगट, काजळी, आपल्या फवारण्यामध्ये रोगांचा विचार करुनच घटक घेतलेले आहे.
♦️ टीप :मर लागत असल्यास भु-धन 100 मि.ली प्रति पंपाने आळवणी करावी